वेस्ट इंडीस दौर्यातून गंभीरची माघार हि बातमी वाचली आणि आश्चर्याचा धक्का बसला. या आधीही सेहवाग ने दुखापतीमुळे या दौर्यातून माघार घेतली. खरे तर खेळाडूना अति क्रिकेटचा फटका बसत आहे. आधी विश्वचषक स्पर्धा आणि आता आयापिअल स्पर्धा. यामुळे खेळाडूना क्रिकेटचा अति ताण पडत आहे. खरे तर विश्वचषक स्पर्धा झाल्यावर खेळाडूंनी वेस्ट इंडीस दौरा डोळ्यासमोर ठेवून विश्रांती घेतली पाहिजे. परंतु खेळाडूना रुपी पैशाचे गजर डोळ्यासमोर दिसत होते. खेळाडूंनी देशासाठी खेळणे सोडून आय्पिअल मध्ये खेळणे पसंद केले. भारताला वेस्ट इंडीस दौरा नेहमी कठीण गेला आहे. आता सुद्धा त्यांचा संघ जरी दुय्यम असला तरी खेळाडूंनी दौर्यावर जाने गरजेचे होते. आयापिअल म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली आहे. कमी वेळात पैसे कमावून देणारा खेळ झाला आहे. त्यामुळे खेळाडू आपले सर्वस्व आयापिअला देत आहेत. क्रिकेटकडे आता फिल्म कलाकार, व्यावसायिक आकृस्त झाले असून यामध्ये पैसा फेको तमाशा देखो अशी अवस्था झाली आहे. कमी वेळात पैसे मिळवून देणारा धंदा म्हणून क्रिकेटकडे पाहिले जात आहे. क्रिकेट खेळाडू म्हणजे पैशाच्या तालावर नाचणाऱ्या बाहुल्या झाल्या आहेत. आणि याचा बळी म्हणजे सेहवाग आणि गंभीर. अशी जर परिस्थिती राहिली तर कसोटी क्रिकेटची अवस्था बिकट होईल.